●उरण विधानसभेचा नव्या आमदाराचा इतिहास पुन्हा घडणार
●भाजपाच्या महेश बालदिने जनहिताची कामे न केल्याने मतदारांमध्ये नाराजीचा सूर
●शेकापचे तरुण नेतृत्व आता उरणकरणा हवे आहे
सुनीता निंबाळकर/उरण,दि.७: स्वातंत्र्यानंतर उरण विधानसभा मतदारसंघ हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता आणि यापुढेही तो राखण्यासाठी नव्या उमेदीने शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. येत्या निवडणूकीत शेकापचे युवा नेते कार्यकुशल व धडाडीचे प्रितमदादा जनार्दन(जेएम) म्हात्रे यांना निवडून येणार आहेत. भाजपाच्या महेश बालदिने गेल्या पाच वर्षात जनहिताची कामे न केल्याने मतदारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. जनहिताची कामे करणारे नेतृत्व लोकांना हवे आहे बिकाऊ आणि भ्रष्टाचारी सरकार आता उलथून पडले पाहिजे अशीच भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
त्यामुळे उरण विधानसभा निवडणुकीत तरुणांना प्रितमदादांच्या रूपाने नवा आमदार हवा आहे. असे मत मतदारसंघातील मतदार व्यक्त करीत आहेत. उरण विधानसभेचे नेतृत्व शेकापचे जेष्ठ नेते माजी खासदार लोकनेते दि. बा. पाटील, माजी विरोधी पक्षनेते दत्ता पाटील,माजी आमदार दत्तूशेठ पाटील
माजी मंत्री मिनाक्षीताई पाटील,माजी आमदार विवेक पाटील यांनी केले आहे. शेतकरी कामगार व सर्वसामान्य जनतेसाठी लढणाऱ्या वीरांचा मतदारसंघ आहे. ज्या १९८१ च्या सिडको विरोधी आंदोलनात लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांच्या साथीने जासई नाक्यावर आपलं रक्त सांडणारे व 1984 च्या ऐतिहासिक उरण शेतकरी आंदोलनाचे नेते सुप्रसिद्ध उद्योजग व शेकापचे जेष्ठ नेते
*जे. एम. म्हात्रे यांचा संघर्षाचा वारसा आहे. त्यामुळे येत्या निवडणूकीत शेतकरी कामगार पक्ष हा नव्या उमेदीने उतरला आहे. त्यासाठी मतदारसंघात गावोगावो बैठका सुरू आहेत. त्यामुळे आता पर्यंत अनेक कारणांमुळे शेतकरी कामगार पक्ष सोडून इतर पक्ष व संघटनेत गेलेले शेकाप कार्यकर्ते पुन्हा एकदा आपल्या मूळ विचारांकडे वळू लागले आहेत. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये ही उत्साह निर्माण झाला आहे. या निवडणुकीत समाजातील सर्व स्थरातील मतदार शेतकरी कामगार पक्षाच्या मागे उभे राहण्यासाठी कार्यकर्त्यांनी दिवसरात्र काम करून शेतकरी कामगार पक्षाचे जुने दिवस परतून आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी उरण विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष हा आरपार ची लढाई लढण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे नवी ऊर्जा घेऊन कार्यकर्त्यानी वज्र्य मूठ घट्ट करून गावोगावी कामाला लागण्याचेही आवाहन त्यांनी केले. आता एकच लक्ष नव्या युगाचा शेकापक्ष असाही नारा या निमित्ताने दिला आहे.