जिल्ह्यात भगवानबाबा मल्टीस्टेटचा सात शाखेचा विस्तार
वेध ताज्या घडामोडींचा/पांडुरंग निंबाळकर दि.१८,अहमदनगर प्रतिनिधी: शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव येथील दि.17 ऑगस्ट रोजी भगवान बाबा मल्टीस्टेट बँकेच्या शाखेचा 9 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रगतशील शेतकरी रंगनाथ वैद्य व सौ मंदाकिनी वैद्य यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली.भगवान बाबा मल्टीस्टेट को ऑप. क्रेडिट सोसायटी लि.अहमदनगर या बँकेचा वेगवेगळ्या ठिकाणी सात शाखेचा विस्तार आहे .या प्रसंगी बँकेच्या शाखेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला बँकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, तसेच शाखेचे विश्वासू ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी शाखेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला . भगवानबाबा मल्टीस्टेटचे चेअरमन मयूरराजे वैद्य यांनी शाखेच्या यशस्वी वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी बँकेच्या ग्राहकांसाठी केलेल्या उत्कृष्ट सेवा आणि शाखेच्या सातत्यपूर्ण विकासाबद्दल कौतुक केले.बोधेगाव शाखेने गेल्या नऊ वर्षांत विविध ग्राहक सेवा उपक्रम राबवून, आपल्या ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. शाखेच्या भविष्यकालीन योजनांबद्दलही या कार्यक्रमात चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व ग्राहकांना आणि उपस्थितांना अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले.बोधेगाव शाखेचा वर्धापन दिन सोहळा हा शाखेच्या सर्वांसाठी एक स्मरणीय अनुभव ठरला आहे. या कार्यक्रमाच्या वेळेस भगवान बाबा मल्टीस्टेटचे चेअरमन तथा सावता परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मयूरराजे रंगनाथ वैद्य, बोधेगाव शाखेचे मॅनेजर सतीश केदार सर, दीपक ढाकणे,संजय टोके, नवनाथ सोनवणे,अशोक वैद्य, श्रद्धा खिळे, प्रतीक टोके, दीपक गर्जे, संतोष वैद्य ,कृष्णा लोणकर, बारगजे सर,आदी ग्रामस्थ व बँकेचे खातेदार ठेवीदार कर्मचारी उपस्थित होते.