बांधकाम परवानगी देतानाच प्रदूषण नियंत्रण नियमांची अट बांधील
नवीमुंबई महानगर पालिकेचा महत्वपूर्ण निर्णय
वेध ताज्या घडामोडींचा /दि.७ ,नवी मुंबई : विविध कारणांमुळे प्रदूषणाची पातळी वाढत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. नविमुंबई परिसरात मोट्या प्रमाणात बांधकाम चालू असल्याने प्रदूषण होत आहे. याविषयी पालिकेकडे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. पालिकेने याची दखल घेऊन परवानगी देतानाच प्रदूषण नियंत्रणाची अट घातल्याने परिसरातील विकासकांवर नियमांचे पालन करूनच बांधकाम करावे लागणार आहे. नवी मुंबईतील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी केले जाणारे स्फोट, ध्वनी तसेच वायू प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी आखण्यात आलेल्या उपायांना दाखविल्या जाणाऱ्या वाकुल्या, वेळी-अवेळी सुरू रहाणारी यंत्रांची धडधड, रस्ते अडवून उभी रहाणारी बांधकाम साहित्याने भरलेली वाहने यामुळे नागरिकांच्या तक्रारींचा ओघ सातत्याने वाढू लागला होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाने यासंबंधी आखलेल्या काही मार्गदर्शक सूचनांचा समावेश थेट बांधकाम परवानगीच्या नियमांमध्ये करण्याचा विचार सुरू केला आहे.
सकाळी नऊ वाजेपासून सुर्यास्त होईपर्यत बांधकामे सरू राहतील अशास्वरुपाचा एक नियम मध्यंतरी महापालिकेने तयार केला होता. या नियमालाही कायद्याचे स्वरुप देता येईल का याची चाचपणी प्रशासनाकडून केली जात आहे. बिल्डरांना बांधकाम परवानगी (सीसी) देतानाच यापैकी काही सूचनांचा समावेश नियम, अटीद्वारे केला जाणार आहे.