जिल्ह्यात केलेल्या कारवाईत 1 कोटी 19 लाख रुपयांचे मुद्देमाल जप्त

जिल्ह्यात केलेल्या कारवाईत 1 कोटी 19 लाख रुपयांचे मुद्देमाल जप्त

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१९,रायगड;–रायगड जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. आचार संहिता जाहिर झाल्यापासून अवघ्या 72 तासांच्या आत पोलीस, राज्य उत्पादन शुल्क तसेच अंमल पदार्थ विरोधी पथकाने जिल्ह्यात केलेल्या कारवाईत 1 कोटी 19 लाख रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.

रायगड जिल्ह्यामध्ये 32-रायगड लोकसभा मतदार संघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे.  दि.16 मार्च पासून आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचार संहितेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन, राज्य पोलीस विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, जीएसटी विभाग, अंमली पदार्थ विरोधी विभाग, पोस्ट विभाग, इंडियन कोस्ट गार्ड, एअरपोर्ट ॲथोरिटी या विविध यंत्रणांच्या माध्यमातून  अवैध दारु विक्री, रोख रकमेची हाताळणी याकडे विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. यासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती इलेक्शन सिझर मॅनेजमेंट सिस्टिम (ESMS) मध्ये नोंदविण्यात आली आहे.

०००००००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *