वेध ताज्या घडामोडींचा/दि.३१,मुंबई: पर्यावरण संवर्धनासाठी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्यातीलच एक सर्व मुंबईकरांना भूरळ पडणारा फ्लॉवर-शो उपक्रम नागरिकांना निसर्गाशी जोडून ठेवतो. ज्या मुंबईतील निसर्गप्रेमी, विद्यार्थी आणि जवळपास सर्वच वयोगटाला भुरळ पडणारा निसर्ग सोहळा म्हणजेच “राणीबागचा फ्लॉवर-शो (Flower-show) जो गेल्या २५ वर्षाहून अधिक काळापासून सातत्याने मुंबईकरांची दाद मिळवत आहे.
उद्यान खात्याच्या अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मेहनती मधून साकारणाऱ्या कलाकृती, संरचना, सजावट यांची नयनरम्य पर्वणी नागरिकाना देण्यासाठी ३-४ महिने पूर्वतयारी करावी लागते.
ज्या ठिकाणी हे प्रदर्शन भरविले जाते
तेथे २-४ दिवस अगोदर विविध जाती प्रजातींची झाडे, झुडूपे, फुले आणि इतर गोष्टींची आकर्षकपणे व संकल्पनेवर आधारित मांडणी केली जाते, ज्याद्वारे लोभणीय निसर्गदृश्य साकारले जाते.
मुंबईकरांना निसर्ग व झाडांविषयी माहिती व्हावी व त्याबद्दल जागरूकता होणे हा मुख्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काँक्रीटच्या जगात आल्हाददायक अनुभव द्यावा म्हणून प्रामुख्याने एक संकल्पना ठरवून त्याप्रमाणे रचना केली जाते.
यावर्षी हा “मुंबई फ्लॉवरशो – मुंबई पुष्पोत्सव” २७ व्या वर्षात पदार्पण करीत आहे व २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान या फ्लॉवर शोचे आयोजन होणार आहे.
यावर्षी “अनिमल किंडग्डम” (Animal Kingdom” या संकल्पनेवर आधारित सजावट केली जाणार आहे.उल्लेखनीय बाब म्हणजे यावर्षी उद्यान खात्यामार्फत मुंबईतील विविध “आर्किटेक्चर कॉलेज” मधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रात्यक्षिक अनुभव घेता यावा याकरिता ३१.०१.२०२४ व ०१.०२.२०२४ रोजी विशेष सत्राचे आयोजन केले आहे.
यामध्ये “आय. ई. एस. कॉलेज”, एल. एस. रहेजा कॉलेज, स्वामी विवेकानंद कॉलेज, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स व रचना संसद मधील विद्यार्थ्यांना निमंत्रित केले असून जवळपास १५०-२०० विद्यार्थी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेणार आहेत. मुंबईच्या landscape दुनियेचे भविष्य घडविणाऱ्या भावी पिढीला याद्वारे मार्गदर्शन करून त्याच्या द्वारे “मुंबईला सुशोभित” करुन “पर्यावरणाचे संवर्धन” करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचा मानस आहे असे उद्यान अधीक्षक “श्री. जितेंद्र परदेशी” यांनी सांगितले.
मुंबई फ्लॉवरशो – मुंबई पुष्पोत्सव” २७ व्या वर्षात पदार्पण
