समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या विविध घरकुल योजनांचा लाभ घ्यावा- डॉ. योगेश म्हसे

वेध ताज्या घडामोडींचा/रायगड,दि.11:- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील शहरी व ग्रामीण कुटुंबांना तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि धनगर या घटकातील ग्रामीण क्षेत्राकरिता घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी केले आहे.

रमाई आवास योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील लाभार्थ्यांचे कच्चे घर असल्यास ग्रामीण भागासाठी 1.00 लक्ष आणि शहरी भागासाठी 3.00 लक्ष कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंब रमाई आवास योजनेंतर्गत 269 चौ.फु.घरकुल मंजुर करण्यात येते. या घरकुलासाठी ग्रामीण क्षेत्राकरिता रु.1.00 लक्ष आणि शहरी क्षेत्राकरिता रु. 2.50 लक्ष अनुदान देय आहे.

तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती या घटकातील लाभार्थ्यांसाठी ग्रामीण क्षेत्राकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत वैयक्तिक घरकुल योजना आणि धनगर समाजासाठी वैयक्तिक घरकुलासाठी योजना आहे. या योजनेसाठी लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न रु.1.0 लक्ष आहे. रु.1.20 लक्ष अर्थसहाय्य आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर देय आहे.

या दोन्ही योजनांकरिता जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, जागेची आवश्यक कागदपत्रे आणि इतर कागदपत्रे आवश्यक आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड-अलिबाग, कच्छि भवन, नमीनाथ मंदिराजवळ, सेंटमेरी स्कूल समोरील श्रीबाग रोड, अलिबाग येथे संपर्क साधवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *