अनधिकृत वजन काटे वापरू नका-उपनियंत्रक वैध मापन शास्त्र सं. ना. कवरे

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१२, रायगड:रायगड जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी,विक्रेत्यांनी अनाधिकृत तोलन मापन उपकरणे,वजने व मापे वापरु नयेत,असे आवाहन वैध मापन शास्त्र, यंत्रणेतील उपनियंत्रक वैध मापन शास्त्र सं. ना. कवरे यांनी केले आहे.

अप्रमाणित वजन काट्यांना राज्य् शासनाची व केंद्र शासनाची वैधानिक मान्यता नाही. अशा वजन काट्यांना अनाधिकृत व्यक्ती त्यांचे स्टिकर लावून त्यांची अनधिकृत विक्री करीत आहे. यामुळे ग्राहकांना माल योग्य वजनात मिळू शकत नाही. यामुळे ग्राहकांचे अर्थिक नुकसान होत आहे.

याकरीता सर्व वजन काटे योग्य उपयोगकर्त्यांना कळविण्यात येते की, आपल्या आस्थापना मध्ये वापरण्यात येणारे वजन काटे हे वैध मापन शास्त्र, यंत्रणेचे अधिनियम व त्या अंतर्गत नियमानुसार आपल्या विभागामधील निरिक्षकांकडून प्रमाणित करुन त्याच व्यवहारामध्ये वापर करावा. वैध मापन शास्त्र, यंत्रणेमार्फत वजने मापे तोलन मापन उपकरणे यांचे फेरपडताळणी व मुद्रांकन केले आहे, अशी प्रमाणित केलेली वैध उपकरणे उपयोगकर्त्यांनी वापरणे कायद्यानुसार बंधनकारक आहे.

वजने मापे तोलन मापन उपकरणे यांचे उत्पादक,विक्री करण्यारे व दुरुस्तकांना या विभागाकडून अधिेकृत परवाना देण्यात आलेला आहे. अशा परवाना धारकाकडून वैध, वजने मापे तोलन मापन उपकरणे खरेदी करावेत व ते वापरण्यासाठी ठेवावी. अवैध/अप्रमाणित वजने मापे तोलन मापन उपकरणांची विक्री करणे व ते वापरणे हे वैध मापन शास्त्र, अधिनियम 2009 व त्या अंतर्गत नियमाचे उल्लंघन असून असे आढळून आल्यास नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही श्री सं.ना.कवरे  यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *