वेध ताज्या घडामोडींचा/दि.५,पुणे:
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नोंदणी महानिरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात यावी अशी मागणी प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मेलद्वारे निवेदन पाठवून मागणी केली.
सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे कि, सध्या नोंदणी विभागामध्ये प्रचंड मोठया प्रमाणात सावळा गोंधळ होत असुन शासनास वर्षाकाठी जवळपास ४५००० कोटी रुपयाचे उत्पन्न देणारा हा विभाग असुन या विभागाची जनतेप्रतीची शिस्त पूर्णतः बिगडलेली असुन नोंदणी कार्यालयमध्ये सर्वत्र अव्यवस्था झाली असुन, एजंटामुळे सर्वसामान्य नागरिकांचे काम सुद्धा होत नाही. या खात्याला प्रचंड अश्या शिस्तीची गरज असुन सध्या नोंदणी विभागामध्ये पुणे शहर व महाराष्ट्रामध्ये मोठया प्रमाणात नियमबाह्य पद्धतीने बोगस एनए ऑर्डर बोगस भोगवटा प्रमाणपत्र जोडून हजारो दस्त नोंदवले आहेत. गोरगरीब जनतेची कोट्यावधी रुपयांची लुबाडनुक झाली आहे. या सर्व बाबी आम्ही उजेडात आणुन सुद्धा संबंधित दुय्यम निबंधक सह जिल्हा निबंधक पुणे शहर यांच्या वरती भारतीय नोंदणी कायदा १९०८ चे कलम ८१ अन्वये गुन्हे दाखल होणे आवश्यक असताना, एकही गुन्हा दाखल झाला नाही. परंतु अशा प्रवृत्तीला पाठबळच मिळत आहे. त्याचप्रमाणे ठाणे शहर अंतर्गत २७ गावातील कल्याण, डोंबिवलीचा अनाधिकृत बांधकामाचा प्रश्न प्रकरणी झालेले दस्त, तसेच सध्या वसई, विरार या भागातील बोगस एनए ऑर्डर द्वारे झालेले दस्त पाहता या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी असुन पालघर जिल्यातील तत्कालीन जेडीआर उदयराज चव्हाण व त्यांचे सब रजिस्टार यांच्यावर कलम ८१ नुसार कारवाई होणे आवश्यक असताना, या बाबी कडे नोंदणी महानिरीक्षक व महसुल उपसचिव हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. नोंदणी विभागाला शिस्त आणायची असेल तर तुकाराम मुंडे यांच्या सारख्या शिस्तप्रिय अधिकाऱ्याला या खात्याला वठणीवर आणण्यासाठी शासनाने त्वरित या ठिकाणी नेमणूक करावी. जेणेकरून महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला न्याय मिळेल आशा स्वरूपाचे निवेदन नुकतेच सादर करण्यात आले आहे.
प्रतिक्रिया: गोंधळ आणि अनागोंदीने ढिसाळ झालेल्या नोंदणी विभागाला सुरळीत करण्यासाठी कर्तव्यदक्ष आणि कर्तव्यतत्पर नोंदणी महानिरीक्षकाची गरज आहे. सध्याच्या नोंदणी महानिरीक्षकांची कार्यपद्धती अकार्यक्षम आणि ढिसाळ आहे. म्हणून आमची मागणी आहे की तुकाराम मुंढे यांच्या सारख्या सनदी अधिकाऱ्याला ही जबाबदारी देण्यात यावी. लोकांची कामेही जलद गतीने होतील आणि विभागातील अधिकाऱ्यांनाही शिस्त लागेल. मुंढे यांच्या प्रशासकीय वचकामुळे अधिकारी दप्तर दिरंगाईपणा करणार नाहीत.
– रोहन सुरवसे-पाटील
सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस