रेशनच्या धान्य वाटपात भ्रष्टाचार होत असल्याने पुरवठा अधिकाऱ्यापुढे लाभार्थीं संतप्त ,
विविध विकास कामात होत असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी बरोबरच अवैध धंदेवाल्यांवरही कारवाई करा – नितीन काकडे पांडुरंग निंबाळकर/वेध ताज्या घडामोडींचा/दि.30,अहमदनगर: जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य व उपसरपंच नितीन काकडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतच्या विविध विकास कामात , सेवा संस्थेच्या वतीने वाटप करण्यात येत असलेल्या धान्य वाटपाची व मार्केट कमिटीच्या गाळा बांधकामाची चौकशी करून भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी शेवगाव गेवराई राज्य मार्गाजवळ बोधेगाव पोलीस दुरुक्षेत्राजवळ दोन तास ठिया आंदोलन करण्यात आले , तालुका पुरवठा अधिकारी विजय चव्हाण , विस्तार अधिकारी महादेव भोसले, दादासाहेब शेळके ,सचिन भाकरे यांचे समोर लाभार्थींनी आक्रोश निर्माण करून भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधितांवर चौकशी करून कारवाई करण्यात येईल अशी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले ,
यावेळी सरपंच सुभाष पौळे , ग्रामपंचायत सदस्य फिरोजभाई पठाण , मयुर हुंडेकरी , बबनभाई कुरेशी , प्रकाश गर्जे ,महादेव घोरतळे , भगवान मिसाळ , रंमजू पठाण , आदीं ग्रामस्थांसह पोलीस उपनिरीक्षक भास्कर गावंडे , पोलीस नाईक ईश्वर गर्जे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप म्हस्के व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.