वेध ताज्या घडामोडींचा/दि.२९,लोणावळा: शरीर आणि उत्तम आरोग्य राखण्यासाठी सतत कार्यान्वित असलेली योगसंस्था, कैवल्यधाम, अशी संस्था जी योग आणि सर्वांगीण आरोग्यासाठी एक प्रसिद्ध केंद्र आहे, ह्या संस्थेच्या एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमात संस्थेने स्वास्थ्य आणि आरोग्य-कल्याण क्षेत्रातील दोन मान्यवर व्यक्तींचा त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी जाहीर सत्कार केला. २८ ऑगस्ट २०२३ रोजी कैवल्यधामच्या भव्य सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. ह्या कार्यक्रमास श्री. रमेश बैस, महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार प्रदान समारंभात बोलताना महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. रमेश बैस म्हणाले, “कैवल्यधाम सारख्या संस्थेने आरोग्य, निरोगीपणा आणि आध्यात्मिक सुसंवाद वाढविण्यात आघाडीवर असलेल्या व्यक्तींचा सन्मान करणे ही एक आनंददायी बाब आहे. ” या पुरस्कार विजेत्यांनी असाधारण समर्पण आणि मानवाच्या कल्याणार्थ आपले जीवन खर्ची घातले असून सामाजिक उत्थानासाठी महनीय योगदान दिले आहे. प्रत्येक व्यक्तीने निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी अशा व्यक्तींचे अनुकरण केले पाहिजे.” कैवल्यधामचे सीईओ श्री सुबोध तिवारी यांनी पुरस्कार प्राप्तकर्त्यांचे मनापासून कौतुक व्यक्त केले, ते म्हणाले, “कैवल्यधाममध्ये, आमचे ध्येय नेहमीच सर्वांगीण कल्याणाच्या तत्त्वांचा प्रसार करणे हे आहे आणि ज्या व्यक्तींनी ह्या तत्वज्ञानाचा त्यांच्या जीवनात अवलंब केलेला आहे अशा व्यक्तींचा सन्मान करताना मला खूप आनंद होत आहे. पुरस्कृत व्यक्तींनी केवळ आपापल्या क्षेत्रातच उत्कृष्ट कामगिरी केलेली नाही तर समाजाच्या कल्याणासाठी हि त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
कैवल्यधाम हि संस्था योग ज्ञानाचा दिवा असून योगाभ्यासाद्वारे जनमानसाच्या आरोग्य- कल्याणाचे उद्दिष्ट ठेवून कार्यरत आहे. अशाच सर्वांगीण आरोग्य साधू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी गेली अनेक दशके हि संस्था मार्गदर्शक ठरली आहे. ज्यांनी आपले जीवन, आरोग्य, निरोगीपणा आणि आध्यात्मिक वाढीसाठी समर्पित केले आहे अशा व्यक्तींचे कौतुक करण्याचा आणि त्यांचा सन्मान करण्याचा संस्थेने सातत्याने प्रयत्न केला आहे. अशाच दोन असाधारण व्यक्तींना कैवल्यधाम स्वामी कुवलयानंद योग पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.