मुंबई गोवा महामार्गावर चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर

खारपाडा टोलनाक्याजवळ तपासणी सुरू

वेध ताज्या घडामोडींचा/दि.26,पेण: उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण- रायगड यांच्यामार्फत व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय रायगड व आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, नवीन पनवेल यांच्या मदतीने दिनांक 23 ऑगस्ट ते 28ऑगस्ट 2023 दरम्यान मुंबई गोवा हायवेवरून  खारपाडा टोल नाका येथून प्रवास करणाऱ्या प्रवासी बसेस चालक यांच्या नेत्र व आरोग्य तपासणीसाठीचे शिबिर चालू आहे.
यामध्ये 23 ऑगस्ट ते 25ऑगस्ट 2023 सकाळी 10:00 ते सायं 5:00पर्यंत उपक्रम पार पडला. तर  रात्री उशिरा चालणाऱ्या प्रवासी चालकांसाठी पुढील 26 ते 28 ऑगस्ट, सायं 6:00 ते रात्री 11:30 वाजेपर्यंत तपासणी चालू राहणार आहे.
यामध्ये ज्या चालकांचे डोळ्यांना चष्मा असणे गरजेचे आहे अशाच चालकांना मोफत चष्मा दिला जाणार आहे.दिनांक 23 ते 25 ऑगस्ट तीन दिवसांत एकूण तपासणी केलेले प्रवासी चालक 584, सुस्थितीत आढळलेले चालक 269, मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आलेले चालक 195 आहेत.
पुढील सखोल तपासणीचा सल्ला दिलेले चालक 114 आहेत. यामध्ये रेटीना:07, कॉर्निया:15, मोतीबिंदू:37, कलर व्हिजन:11, कंजेक्टिव्हिटीज : 02 यांचा समावेश असल्याचे आरटीओ अधिकारी शशिकांत तिरसे यांनी सांगितले.

या शिबिराचा लाभ मुंबई गोवा महामार्गावर चालणाऱ्या सर्व प्रवासी बस चालकानी घ्यावा असे आवाहनन पेण-रायगडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकते यांनी केले आहे. यावेळी आरटीओ अधिकारी शशिकांत तिरसे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *