13 सप्टेंबरला पुणे व 29 सप्टेंबर रोजी मुंबई येथे पेंशन अदालतीचे आयोज
वेध ताज्या घडामोडींचा/सातारा दि.25: डाक विभगाच्या निृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीधारकांसाठी पोस्टमास्तर जनरल पुणे यांनी 13 सप्टेंबर तर मुख्य पोस्टमास्तर जनरल महाराष्ट्र सर्कल मुंबई यांच्याद्वारे 29 सप्टेंबर रोजी तर रोजी सकाळी 10 वाजता पेंशन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पोस्ट मास्तर, सातारा कार्यालयाकडून देण्यात आलेली आहेत.
मुंबई येथील पेंशन अदालतीसाठी 25 ऑगस्ट तर पुणे येथील पेंशन अदालतीसाठी 30 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करावेत. पेंशन अदालतीमध्ये निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत, ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झाला आहे, टपाल विभाग तसेच पुणे क्षेत्रामधील निवृत्तीधारक ज्यांचे 3 महिन्याच्या आत निपटारा झाला नाही अशा प्रकरणांचा डाक पेंशन अदालतीमध्ये विचार केला जाणार आहे.