एफ डी एलच्या कांबी हायस्कूल येथे 76वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न
वेध ताज्या घडामोडींचा/अहिल्यानगर प्रतिनिधी (पांडुरंग निंबाळकर )दि.२७,
शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील कांबी येथे
76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमप्रसंगी अध्यक्ष व मुख्याध्यापक दिगंबर पवार सरांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.संदेश देताना ते म्हणाले स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्याना सदैव स्मरणात ठेवावे. प्रजासत्ताकदिनाचे महत्त्व सांगत संस्था व शाळा विकासाबद्दल माहिती दिली.
बँड पथकाच्या तालात, घोषणांच्या जयघोषात संपूर्ण गावातून प्रभातफेरी काढण्यात आली.शाळेत आल्यानंतर झेंडावंदन होऊन इ.8वी वर्गाने परेड संचालन द्वारे व्यासपिठावरील मान्यवरांना मानवंदना देण्यात आली.नंदू खाडे यांनी मुलांची बँड पथकाबरोबर कवायत घेतली.विविध स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. जनशक्तीचे अकबरभाई शेख, बाबानाना म्हस्के,पोलीस महादेव गोयकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा शेलार व स्वाती वाहुरवाघ यांनी केले. प्रास्ताविक स्कूल एचआर सचिन शिंदे यांनी केले.यावेळी बाळासाहेब नरके ,इसाक शेख ,ईश्वर शिंदे,विठ्ठल चांडे यांनीही मुलांना बक्षिसे दिली.याप्रसंगी बाबानाना म्हस्के,अकबरभाई शेख, बाळासाहेब नरके,नारायण गाडे,दत्तात्रय काटमोरे,पो.पा. बबनराव होळकर,महादेव गोयकर, सिराजभाई शेख,पिरमहंमद शेख, बाजीराव लेंडाळ,सुमित पांचारियाआदी मान्यवर तसेच एकनाथ जवरे,अनिल ढवळे,रावसाहेब पवार, बाळासाहेब डेंगळे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.