व्यंकटेश म्हणजे सर्वसामान्यांची आशा : चेअरमन कृष्णा मसुरे
सुपरस्टार सुबोध भावे यांच्या हस्ते दिनदर्शिका प्रकाशन संपन्न
वेध ताज्या घडामडींचा/अहिल्यानगर प्रतिनिधी, पांडुरंग निंबाळकर, दि. 28: व्यंकटेश मल्टीस्टेट सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचून त्यांना बॅंकिगच्या सेवा देत आहेत. आजघडीला पुढे जायला कोणाची तरी सोबत हवीच असते. ती सोबत न मागता व्यंकटेश मल्टीस्टेट सर्वांना देत आहे, या गोष्टीचा मला अभिमान असल्याचं मत व्यंकटेश मल्टीस्टेटचे ब्रँड अॅंबेसेडर, मराठी चित्रपट अभिनेते, सुपरस्टार सुबोध भावे यांनी व्यक्त केलं. ते व्यंकटेशच्या २०२५-दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. या दिनदर्शिकेचे प्रकाशन त्यांच्याच हस्ते करण्यात आले.या शुभ प्रसंगी संस्थेचे चेअरमन मा. श्री. कृष्णा मसुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. वैभव माने, भारतम्‘चे संस्थापक, मा. श्री. मनोज शर्मा, डिझाईन ॲडिक्टचे मा. श्री. ज्ञानेश शिंदे आणि मार्केटिंग हेड मा. श्री. ज्ञानेश्वर झांबरे विविध अधिकारी उपस्थित होते.
या वेळी चेअरमन कृष्णा मसुरे म्हणाले की, व्यंकटेश म्हणजे सर्वसामान्यांची आशा आहे. त्यामुळे आमच्या कोणत्याही शाखेत आलेल्या व्यक्तीला आम्ही त्याचे समाधान केल्याशिवाय सोडत नाही. गेल्या १२ वर्षांपासून व्यंकटेश सदैव ग्राहकांच्या सेवेत तत्पर आहे. तसेच, ग्राहकांचे आयुष्य आणखी सहज आणि सोपं कसं करता येईल, यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. याशिवाय ज्या सुविधा राष्ट्रीयकृत बॅंकेत आहेत, त्याचं सुविधा आम्ही सर्वसामान्यांपर्यंत पोहचवत आहोत, असेही ते म्हणाले.मसुरे म्हणाले की, व्यंकटेशने गेल्या १२ वर्षांपासून जे कमावलं आहे. तेच या दिनदर्शिकेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, सर्वांच्या पाठिब्यांमुळेच व्यंकेटश फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रमही राबवता येत असल्याची पुष्टी ही त्यांनी या वेळी जोडली. यामध्ये आरोग्यावर अधिक महत्व दिल्या जात असून आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात येत आहे. तसेच, बेरोजगारांसाठी विविध प्रशिक्षण घेण्यात येत आहेत. याचबरोबर महिलांना उद्योग-व्यवसाय उभारण्यासाठी मदत केल्या जात असल्याचेही ते म्हणाले. या वेळी त्यांनी व्यंकटेश फाऊंडेशनच्या सामाजिक बांधिलकीच्या चळवळीत सर्वांना सामील होण्याचे आवाहन त्यांनी केलं. वैभव माने म्हणाले की, व्यंकटेश म्हणजे विश्वास.. गेल्या १२ वर्षांपासन देत असलेल्या विश्वसनीय सेवेंमुळे आज व्यंकटेशच हे ब्रीदवाक्य प्रत्येक नागरिकांच्या तोंडी रुळले आहे. व्यंकटेशने प्रत्येक ग्राहकाला दिलेला शब्द पाळला आहे. त्यामुळेच आज व्यंकटेशच्या डिजिटली सहज आणि सोप्या सेवांचा लाभ ३ लाखांहून अधिक समाधानी ग्राहक घेत असल्याचा आम्हाला आनंद आहे. तसेच, आणखी लोकांपर्यंत पोहचून आम्हाला त्यांचा व्यवसाय वाढवण्यात आणि उभा करण्यात मदत करायची आहे, असेही ते म्हणाले.व्यंकटेश मल्टीस्टेटच्या 2025- दिनदर्शिकेचे प्रकाशन प्रत्येक शाखेत करण्यात आले. या प्रकाशनाला ठेवीदार, खातेदार, सभासद, शेतकरी आणि हितचिंतक यांची प्रमुख उपस्थिती होती. या आकर्षक दिनदर्शिकेत संस्थेचं कार्य, विविध प्राॅडक्ट, सेवा व उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे. तसेच, व्यंकटेश मल्टीस्टेटचे ब्रँड अॅंबेसेडर, मराठी चित्रपट अभिनेते, सुपरस्टार सुबोध भावे यांची दिनदर्शिकेवरील झलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यात उपस्थित सर्वांना 2025- दिनदर्शिका भेट म्हणून देण्यात आली.