बालमटाकळीत भगवान विद्यालयात विज्ञान प्रदर्शन
वेध ताज्या घडामोडींचा/दि.13,अहिल्यानगर प्रतिनिधी,पांडुरंग निंबाळकर : शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात दि.12 रोजी बालमटाकळी येथील श्री. रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळ आणे संचलित श्री. भगवान माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रदर्शनात विविध प्रकारच्या प्रतिकृती,स्वनिर्मित प्रयोग व रांगोळीच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान, सौरऊर्जेची निर्मिती जलसिंचन,व त्याचे फायदे या सह विविध विषयीतुन संदेश देण्यात आला. तसेच आनंद बाजार मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रा. विजय लेंडाळ यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात नावीन्यपूर्ण उपकरणे व प्रयोग सादर केले. विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जी काही संशोधक वृत्ती आहे त्या वृत्तीला नक्कीच चालना मिळेल. आनंद बाजार मेळाव्यात देखील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अनेकांनी वेगवेगळी स्टॉल (दुकाणे) लावून आणलेल्या खाद्यपदार्थाची विक्री केली . विद्यार्थ्यांनीही आनंद घेतला.यामुळे विद्यार्थ्यांना व्यवहार कसा करावा याचा उत्तम अनुभव आला. मेळाव्यात मांडण्यात आलेल्या स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण पाककृतींचा आस्वाद घेतला. सर्व विज्ञान शिक्षकांनी प्रदर्शनाचे उत्तम नियोजन केलेहोते.यावेळी शाळेचे प्राचार्य उत्तम रक्टे सर, पर्यवेक्षक लक्ष्मण गागरे सर,काकासाहेब भाकरे,राजकुमार तोतरे,भास्कर आंधळे,राजेंद्र मराठे, प्रसाद कुलट,अकुश ढाकणे,प्रमोद जोशी,रामेश्वर वडघणे,विशाल मुळे,श्रध्दा नजन,पुजा गरुड,पांडुरंग शिंदे,रुषिकेश फुंदे ,रोहण वडघणे,शंकर शिंदे,चंद्रकांत खरात या सह सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.