श्री भगवान विद्यालयात मेजर तुषार बहिर यांच्या हस्ते तिरंगा ध्वजारोहण
वेध ताज्या घडामोडींचा/दि.१५,अहमदनगर प्रतिनिधी /पांडुरंग निंबाळकर;
बालमटाकळीत आज 78 वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 7 वाजता शाळेच्या मैदानावर ध्वजवंदन सोहळा पार पडला. मेजर तुषार बहिर, मेजर आकाश बांमदळे यांच्या हस्ते तिरंगा फडकवून स्वातंत्र्यवीरांना आदरांजली वाहण्यात आली. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते गायली आणि शाळेच्या मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सरपंच डॉ. राम बामदळे, रामनाथ राजपुरे, कासम शेख, युवा उद्योजक सचिन नरवडे होते . त्यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आठवण करून दिली आणि तरुण पिढीला देशसेवेचे महत्त्व पटवून दिले.गावातील सर्व नागरिकांनी या उत्सवात सहभागी होऊन देशभक्तीचे प्रदर्शन केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त गावातील प्रमुख रस्त्यांवर तिरंगा झळकत होता आणि वातावरण देशभक्तीमय झाले होते. कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत आणि स्थानिक शाळांच्या सहकार्याने करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आले आणि ‘भारत माता की जय’ वंदे मातरम,घोषणा देत कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळेस उपसरपंच सर्जेराव घोरपडे, संदीप देशमुख,अशोक खिळे, भगवान विद्यालयाचे प्राचार्य उत्तम रक्टे सर , लक्ष्मण गागरे सर ,ग्रामसेवक बाबासाहेब अंधारे, ग्रामपंचायत सदस्य विक्रम बारवकर, गणेश शिंदे, श्याम राजपुरे, विठ्ठल देशमुख, महेश घरगणे, दिलीप भोंगळे, सोसायटीचे माजी चे.हरिचंद्र घाडगे, भारत घोरपडे, सो.मा. व्हा.चे. माणिक शिंदे, सोसायटीचे व्हा. चेअरमन दत्तात्रय भिसे , भाऊसाहेब टेकाळे,बाबासाहेब वाघुंबरे, राज बागडे,सर्व विद्यार्थी,शिक्षक स्टाफ उपस्थित होता.